दिपनगर कामगार वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासन अनभिज्ञ

दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या दिपनगर कामगार वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर घटनेकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. नवीन प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाल्यापासून या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
कामगार वसाहतीमध्ये प्रवेश करणाऱ्या कंत्राटदारांना आणि त्यांच्या कामगारांना प्रवेशपत्र देणे आवश्यक आहे. तसेच, कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी करणेही गरजेचे आहे. परंतु, नवीन 1X660 मे.वॅ. प्रकल्पाच्या स्थापत्य विभागातील कंत्राटी कामगारांना प्रवेशपत्र दिलेले नाही. तसेच, सुरक्षा विभागाने त्यांची कोणतीही चौकशी केलेली नाही, असा आरोप कामगार वसाहतीतील नागरिकांनी केला आहे.

कामगार संघटना आक्रमक
या घटनेमुळे कामगार वसाहतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुरक्षा विभागाच्या आणि विद्युत केंद्र प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लवकरच कामगार संघटनांकडून या घटनेची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.

Protected Content