ट्रक लांबविणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रत्नाकर नर्सरी येथून पार्कींगला लावलेला ट्रक चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता धुळ्यातून अटक केले आहे. अटकेतील तिघांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरूण परिसरातील राहणारे वसीम अहमद सुलतान अहमद याच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ५३१०) हा राष्ट्रीय महामार्गावरल विशाल पेट्रोल पंपानजीकच्या रत्नाकर नर्सरीजवळ पार्कींगला लावलेला होता. मंगळवारी २९ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री चोरट्यांनी हा ट्रक चोरून नेला होता. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा ट्रक धुळे पोलीसांनी चाळीसगाव रोडवर पकडला. यात नवाज सादिक सैय्यद, वय 31, रा. तांबापुरा जळगाव, शहजाद रशीद शेख, वय 22, रा. रामरहिम कॉलनी जवळ मध्यप्रदेश आणि अवेजखान जहागीरखान, वय 21, रा. नशिराबाद जळगाव या तिघांना अटक केली. ट्रक चोरट्यांना पकडल्याबाबत एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता धुळे पोलीसांनाकडून ताबा घेवून अटक केली आहे. दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयातील सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता तिघांना २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कारवाई

एमआयडीसी पोस्टेचे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, जमील शेख, सुधीर साळवे, निलोफर सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, तसेच धुळे पोस्टेचे पोलीस निरिक्षक धिरज महाजन, पोहेकॉ एस. सी. पाथरवट, ए.व्ही वाघ, अशांनी केली.

Protected Content