दमदाटी करून वृध्देच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लांबविल्या

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अशोक नगरातील अंगारा ढाब्याजवळ महिलेला दमबाजी करून त्यांच्या हातातील १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या जबरी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांत्रीबाई किसनचंद सुग वय ८५ या महिला आपल्या परिवारासह भुसावळ शहरातील महेश नगरात वास्तव्याला आहेत. शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तांत्रीबाई ह्या शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहरातील अशोक नगरातील अंगारा ढाब्याजवळून पायी जात असतांना अज्ञज्ञत्‍ व्यक्तीने दमदाटी करून त्यांच्या हातातील १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या जबरी काढून पसार झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहे.

Protected Content