चोपडा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा तालुका शासकिय क्रीडा स्पर्धेत खो- खो खेळात खर्डी येथील शारदा माध्यमिक विद्यालयाने मुलींच्या १४ वर्षा आतील व १७ वर्षाआतील गटात अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला.
१५ सप्टेंबर रोजी रविवारी धानोरा येथील झि.तो.महाजन विद्यालयात १४ वर्षा आतील व १७ वर्षाआतील मुलींचे खो – खो सामने खेळण्यात यात सुटी असून देखील तालुक्यातून मोठ्या संख्येने मध्यामिक शाळांचे संघ सहभागी झाले. यात मुलींच्या १४ वर्षाआतील अंतिम सामन्यात शारदा माध्यमिक विद्यालय खर्डीचा संघ विजेता तर पंकज विद्यालय चोपडा हा संघ उपविजेता ठरले. तसेच १७ वर्षाआतील मुलींचा सामना शारदा माध्यमिक विद्यालय खर्डी विजयी झाले तर झि.तो.महाजन विद्यालय धानोरा उपविजेता ठरले.
स्पर्धा यशस्वितेसाठी चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर. पी. आल्हाट, तालुका क्रीडाशिक्षक संघटना अध्यक्ष अशोक साळुंखे, क्रीडास्पर्धा आयोजक झी. तो. महाजन माध्यमिक विद्यालय धानोरा चेअरमन प्रदीप महाजन, संचालक वाय सी पाटील, माजी उपसभापती माणिकचंद महाजन उपमुख्याध्यापक नवल महाजन, क्रीडाशिक्षक देविदास महाजन वासुदेव महाजन, आर. टी. पाटील, पी. आर. माळी, भुषण गुजर, गौरव महाजन, नयन महाजन यांचे सहकार्य लाभले.