उपमहापौर गोळीबार प्रकरणातील चौथा संशयित पोलीसांना शरण

जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या झालेल्या गोळीबार प्रकरणातील चौथा संशयित आरोपी रामानंद पोलीसांना शरण आला आहे. यापुर्वी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. उद्या चौथ्या संशयिताला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहर मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला करीत गोळीबार करण्यात आला होता. कुलभूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी  किरण शरद राजपूत (वय-२४ ), उमेश पांडुरंग राजपूत (वय-२१) आणि  महेंद्र राजपूत सर्व रा. पिंप्राळा यांनी अटक करण्यात आली होती. यातील तर मंगलसिंग राजपूत, जुगल बागुल व भुषण बिऱ्‍हाडे हे फरार आहेत. यातील चौथा संशयित आरोपी मंगलसिंग युवराज राजपूत (वय-३२) रा. पिंप्राळा हा आज रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीसांना शरण आला असून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्यात संशयितांकडून पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.   या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

 

Protected Content