ड्यूरो सेंटर उभारण्यासाठी मदतीचा ओघ ; तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांचा पुढाकार

 

रावेर प्रतिनिधी । रावेर ग्रामीण रूग्णालयात ड्यूरो सेंटर उभारण्यासाठी तहसीलदारसह कर्मचा-यांनी २३ हजार पाचशे रुपये जमा केले आहे. यात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आपला पूर्ण एक दिवसाचा पगार  ड्यूरो सेंटर उभारण्यासाठी दिला आहे.

रावेर ग्रामीण रूग्णालयात ड्यूरो सेंटर उभारण्यासाठी रावेर तालुक्यातुन भर-भरून प्रतिसाद लाभत आहे.आता पर्यंत पाच लाखाच्यावर कॅश व चेक स्वरुपात निधी जमा झाला आहे. यात तहसीलदारसह कार्यालयीन अधिकारी मंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी २३ हजार ५०० रुपये कॅश स्वरुपात जमा केला आहे.लवकरच रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटरच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.

केमिस्ट असोसिएशन तर्फे ३५ हजाराची मदत

केमिस्ट असोसिएशनतर्फे रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन ड्यूरो सिलेंडर बसविण्यासाठी ३५  हजार  रुपयांचा धनादेश  तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. याप्रसंगी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय चौधरी , सहसचिव प्रवीण सरोदे, विजय चौधरी, अजय पाटील आदी उपस्थित होते.तर रावेर शहरातील डाक्टरांकडून १८ हजाराची मदत मिळाली आहे.

 

Protected Content