जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकाने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी धूर्तपणे काढलेली मोबाईलवरील छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकून बदनाम करण्याची धमकी देत कालांतराने अशी छायाचित्रे काढणाऱ्या दुसऱ्या मित्रानेही पीडितेच्या असहायतेचा गैरफायदा घेत बलात्कार केला. त्यानन्तरही या दोघांनी पुन्हा त्याचा आधारावर ब्लॅकमेल करून आता आमच्या दोघांशीही शारीरिक संबंध ठेव अशी दिल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. या दोन्ही आरोपींविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गल्लीतील राहणाऱ्या तेजस दिलीप सोनवणे (वय-२०) याच्यावर प्रेम होते. मुलगी दहावीचा निकाल घेण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी शाळेत गेली होती. निकाल घेतल्यानंतर परत घरी जात असतांना तेजस सोनवणे आला. त्यावेळी तेजसचा मित्र चेतन पितांबर सोनार (वय-२०) हा देखील होता.
तेजसने मुलीला दुचाकीवर बसवून शहरातील कोल्हे हिल्स टेकडीवर नेवून गप्पा मारल्या. त्यांच्या पाठोपाठ चेतनही दुचाकीने कोल्हे हिल्सवर पोहचला. पीडिता आणि तेजसच्या गप्पांनंतर एका इमारतीच्या आडोश्याला तेजसने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. याचवेळी चेतने चोरून मोबाईलमध्ये फोटो काढले होते. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीने तेजसशी बोलणे बंद केले होते. दोघांचे बोलणे बंद झाल्याचा गैरफायदा घेत चेतन सोनार याने पिडीतेशी मैत्री वाढविली.
वर्षभर चाललेल्या मैत्री नंतर चेतनने पिडीतेला गोड बोलून फेब्रुवारी २०२० (नक्की तारीख माहिती नाही) मध्ये पुन्हा कोल्हे हिल्स येथे नेले. पिडीत मुलीला यापुर्वी तेजसने केलेल्या बलात्काराचे फोटो दाखविले. हे फोटो पाहून अल्पवयीन मुलीला धक्काच बसला. “मलाही शरीर संबंध प्रस्थापित करू दे, नाहीतर हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, तुझ्या घरच्याने मोठे नुकसान करेल अशी धमकी दिली”. धमकीनंतर चेतननेही फोटो दाखवून पिडीत मुलीचा गैरफायदा घेवून बलात्कार केला. तोपर्यंत ही घटना मुलीने आई वडीलांना सांगितलेली नव्हती.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांनी पिडीत मुलीच्या नावाने शेरेबाजी करण्यास सुरूवात केली. ते फोटोची धमकी देवून पुन्हा दोघांसोबत संबंध ठेवण्याबाबत दबाव टाकत होते. हे सर्व असह्य झाल्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार पिडीत मुलीने आईवडीलांना सांगितला. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांच्याविरूध्द पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपी तेजस सोनवणे हा शहरातील एका राजकीय पक्षाच्या वजनदार पदाधिकारी असलेल्या महिला नेत्याचा मुलगा आहे
आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना
आरोपी फरार झाल्याने खबऱ्यांकडून गुप्त माहिती काढून त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांची पथके काही ठिकाणी रवाना झाली आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षका भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहकॉ दिनेशसिंग पाटील, हकीम शेख, रविंद्र पवार, महिला पोलीस नाईक अभिलाषा मोरे, धनंजय येवले, राहुल पाटील पुढील तपास करीत आहे.