दुचाकी अपघातात महिला जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरून जात असतांना अज्ञात दुचाकीधारकाने महिलेच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वंदना सुनिल ठाकूर (वय-४२) रा. वाघ नगर, जळगाव या महिला आपल पतीसह वास्तव्याला आहे. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वंदना ठाकूर या महिला बी.जे. मार्केट मधून खरेदी करून घरी जाण्यासाठी स्कूटीने निघाले. त्यावेळी बीएसएनएल कार्यालयासमोर स्कूटीने जात असतांना दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएच ९००८) ने जोरदार धडक दिली. या अपघातात वंदना ठाकूर या गंभीर जखमी झाल्या.

त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने खागसी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकी धारकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content