जळगाव प्रतिनिधी । वादी आणि प्रतिवादी पती, पत्नीचे अखेरचे जबाब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने नोंदवून आज येथील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाच्या खटल्यात अंतिम निवाडा केला. अशा प्रकारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जबाब नोंदवून न्यायालयाने जरी केलेला हा जिल्ह्यातील दुसऱ्या निकाल ठरला आहे.
ऍड ज्योती भोळे यांनी सांगितले कि, यापूर्वी नागपूर, पुणे, नासिक येथील न्यायालयांनी असे निकाल दिलेले आहेत. जळगावातील या दाव्यात पती जळगावात वास्तव्यास आहे आणि त्याची पत्नी नोकरीनिमित्त मलेशियात म्हणजे विदेशात वास्तव्यास आहे.
कोरोना आजाराच्या साथीमुळे विमाने बंद असल्याने या पत्नीला अखेरच्या जबाबासाठी विमानाने भारतात येणे शक्य नव्हते म्हणून न्यायाधीशांनी हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने तिचा जबाब नोंदवून घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तो त्या दोघांना कळवल्यानंतर त्यांनी तो त्यांनी केला होता.
त्यानुसार आज ही अखेरचा जबाब नोंदवण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हिंदू विवाह कायद्याच्या (१९५५) कलम १३ ( बी ) नुसार आपसातील संमतीने या घटस्फोटाचा निवाडा न्या. रितेश लिमकर यांनी जाहीर केला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/609694676640645/