मुंबई प्रतिनिधी । विडिंजविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० सामन्याच्या मालिकेतील शेवटचा व अंतिम सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून अंतिम फेरीसारखा असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना विक्रम रचण्याची संधी आहे. विराटने आजच्या सामन्यात सहा धावा करताच त्याच्या नावावर एक आणखी एक विक्रम होणार आहे. भारतीय खेळपट्टीवर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एक हजार धावा करण्याचा विक्रम रचण्याची संधी विराटला आहे. याआधी घरगुती मैदानावर खेळताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल (१४३० धावा) आणि कॉलिन मुनरो (१००० धावा) यांनाच हा पल्ला गाठता आला आहे. विराटने सहा धावा केल्यास तो यादीतील तिसरा व पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो.