शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तयार केला शेतरस्ता (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जामडी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्यांच्या शेतीपासून मुख्य रस्त्यापर्यंतचा दीड किमी लांबीचा रास्ता स्वखर्चाने तयार केला आहे त्यामुळे त्यांना आता शेतमाल शेतातून आणताना नुकसान होण्याची भीती राहिलेली नाही .

सध्या पाऊस भरपूर पडत असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत यामुळे नदीच्या काठावरील गावाच्या शेतकऱ्यांना नदी-नाले ओलांडून तयार शेतमाल बाजारात नेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या प्रयत्नात अनेकवेळा शेतमालाचे नुकसान देखील होत आहे अशाच घटनेत 5 सप्टेंबररोजी हिवरखेडा येथील शेतकरी शिवदास जाधव यांचा आद्रकने भरलेला ट्रॅक्टर नदीच्या पाण्यात पलटी होऊन संपूर्ण आद्रक वाहून गेल्याने हा शेतकरी जागेवर बेशुद्ध पडला होता त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील शेतकरी दिपकसिंग राजपूत, भगवान परदेशी, अरुण जाधव, अनिल जाधव, राजु परदेशी, सरदार परदेशी यांनी अशी वेळ आपल्यावर येऊ नये व आपल्याही शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतामध्ये जाण्यासाठी नदी सोडून जवळपास दीड किलोमीटर अंतराचा शेत रस्ता स्वखर्चातून बनविला.

आता या शेतकऱ्यांना शेतातील माल केळी टमाटा अद्रक सुरक्षितपणे शेतातून बाहेर आणून बाजारात विकायला नेता येणार आहे कुठल्याही शासकीय मदतीची वाट न पाहता तयार केलेल्या या रस्त्यामुळे या शेतकऱ्यांचे परिसरात कौतुक होत आहे स्वतःच्या मालाच्या सुरक्षितेसाठी घेतलेली ही काळजी कौतुकास्पद असून यामुळे शेतकऱ्याची मेहनत पाण्यात जाणार नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात . मदत हवी तशी वेळेवर हातात पडत नाही म्हणून आम्ही स्वतः आमचा रस्ता तयार केला असे जामडी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपकसिंग राजपूत यांनी सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/613732242658021/

Protected Content