शामी गोंडा स्पर्धा गाजविणार्‍या बैलाचा मृत्यूने शेतकरी हळहळला

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे अल्पशा आजाराने एका बैलाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान या बैलाने शमी गोंडा शर्यतीत बरीच बक्षिसे जिंकली होती.

त्या बैलावर चार ते पाच दिवसापासून प्राथमिक उपचार चालू होते पोळ्याच्या दिवशी मृत्यू झाल्याने दुर्दैवी घटना घडली. येथील रहिवासी जनार्धन वसंत शेलार यांच्या मालकीचा बैलाने आडगाव मध्ये शामि गोंडा मध्ये आडगाव येथे त्या बैलाने भरपूर बक्षीस मिळवून दिले होते प्रेत यात्रा गावातील एका ट्रॅक्टरला सजवून सर्व गावातील शेतकऱ्यांनी गावांमधून वाजत-गाजत मिरवणूक काढून प्रेत यात्रा काढली व गावातील जवळ असलेल्या शेतामध्ये त्याचे अंत्यविधी करण्यात आला व गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व शेतकरी बांधव प्रेत यात्रा मध्ये उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!