सर्पदंशाने मयत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास मिळणार ४ लाख रूपयांची आर्थिक मदत

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथे विषारी साप चावल्यामुळे मृत्यू झालेल्या आदिवासी शेतकरी मुबारक तडवी यांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४ लाख रुपये आणि स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा या योजनेअंतर्गत ३ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती तलाठी समीर तडवी आणि कृषी सहाय्यक गजानन निंबोलकर यांनी दिली. 

यावल दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मुबारक दगडु तडवी (वय ३३ वर्ष) राहणार बोरखेडा खुर्द तालुका यावल येथील राहणारे आदीवासी शेतकरी आपल्या बोरखेडा खुर्द शिवारातील शेतात हरभरा काढणीचे काम करीत असतांना तडवी यांच्या विषारी पायास चावा घेतल्याने त्यांना तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते नंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मुबारक तडवी यांचे दुदैवी निधन झाले .आज दुपारी त्यांच्या बोरखेडा गावात त्यांचा दफनविधी करण्यात आला . या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परसाडे परिसराचे तलाठी समिर तडवी व कृषी सहाय्यक गजानन निंबोलकर बोरखेडा गावातील पोलीस पाटील सद्दाम तडवी यांनी मयत तडवी व त्यांच्या कुटुंबातील वडील दगडु तडवी त्यांची पत्नी व दोन लहान मुलींची भेट घेवुन सांत्वन केले व शासनाच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांच्या माध्यमातुन मयताच्या कुटुंबास भरीव मदतीसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

 

 

Protected Content