या’ दिवशी जाहीर होईल लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूक १९ एप्रिल पासून सुरु झाली होती. १ जून ला म्हणजेच येत्या शनिवारी लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा संपतो आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. एनडीएसह आम्ही ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत असे भाजपाने म्हटले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीसह विजयाचा दावा केला आहे. अशातच एक्झिट पोल चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा शनिवारी संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच ६.३० वाजल्यापासून विविध वाहिन्यांवर एक्झिट पोल सुरु होतील. एक्झिट पोल हा निकालाचा अंदाज असतो. १ जूनच्या संध्याकाळी ६.३० पासून एक्झिट पोल सुरु होतील. एक्झिट पोल मतदान संपल्यानंतर ३० मिनिटांनी सुरु होईल याचं कारण निवडणूक आयोग मतदान सुरु असताना एक्झिट पोलची संमती देत नाही.

Protected Content