प.वि.पाटील विद्यालयात स्नेहसंमेलनाचा जल्लोष

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्रमुख पाहुणे जळगांव परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शाळेचे उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर लिपिक देवेंद्र चौधरी यांनी महा.राज्य खा.प्रा.शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या राज्य शिक्षकेतर प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुरुवातीला उपशिक्षक योगेश भालेराव यांनी बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर केला व त्यानंतर चिमुकल्यांचा विविध कला दर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मोरया मोरया , अंबेचे गोंधळी, कोकणी नृत्य , गुजराती घुमर , आई भवानी गोंधळ यासारखे पारंपारिक नृत्य , फनी डान्स , बम बम भोले , इतनी सी हसी , दिल पे मास है तर सामी सारखे धमाल नृत्य तर राष्ट्रभक्ती पर , बेटी बचाओ , सोशल मेडीआ चे दुष्परिणाम यावर आधारित म्युझिकल ड्रामा तर शिवाजी महाराजांचा पोवाडा अशा विविध विषयांवर आधारित सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला. प्रसंगी शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , प्रा.एस.एस.पाटील , अविनाश चौधरी , आरती चौधरी , प्रणिता झांबरे , मंजुषा चौधरी तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उमेश सूर्यवंशी , विश्वजित चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांनी केले , सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले तर निवेदन मंगल गोठवाल तसेच गायत्री पवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content