बालसंस्कार शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील बालसंस्कार एज्युकेशन शैक्षणिक मंडळ यावलव्दारे संचालीत बाल संस्कार विद्या मंदीराच्या वतीने नवीन २०२४ या शैक्षणीक वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांचे गुरूजनांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. शाळेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारा सोबत गोड पदार्थ म्हणुन (जिलेबी) देण्यात आले. विद्यार्थ्यांमधे शाळेच्या पहिल्या दिवशी खुप उत्साहाचे वातावरण दिसुन येत होते, विद्यार्थ्यांचेआपले शाळकरी सहकारी त्यांचे वर्ग मित्र मागील दोन महिन्याच्या सुट्टीनंतर त्यांना प्रथम भेटल्याचा आनंद व उत्साहा हा त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी,शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते .

Protected Content