यावल येथे दारूच्या नशेत तरूणाने घेतला गळफास

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल गावाजवळील दगडी येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. हातभट्टीमुळे तरूण व्यसनाधिन होत असल्याने संतप्त महिला आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

सविस्तर माहिती अशी की, विजय वसंत ठाकरे (वय-३५) रा. दगडी मनवेल ता.यावल जि.जळगाव हा तरूण आपल्या आई वडीलांसह पत्नी व दोन मुलींसह राहतो. विजयने आज सकाळी राहत्या घरात कोणीही नसतांना दारूच्या नशेत दोरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. गावात सुरु असलेल्या अवैध हातभट्टी दारुच्या आहारी जावुन अनेक तरुण हे व्यसनाधीन होत असल्यामुळे अनेक मोलमजुरी करणाऱ्यांचे घर उध्वस्त होत असल्याने गावातील दारुबंदी झाली पाहीजे अशी संतप्त भावना परिसरातील शेकडो महिलांकडुन व्यक्त केली जात असुन ही हात भट्टीच्या दारूचे धंदे तात्काळ बंद न झाल्यास महीला वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

Protected Content