मुंबई वृत्तसंस्था । सीबीआय सुशांतच्या मृत्यूचं सत्य शोधण्यात गुंतलं असताना या प्रकरणात अमली पदार्थांची चौकशी करण्यात नारकोटिक्स ब्युरो गुंतलं आहे. आरोपी ड्रग पेडलर झैद विलात्राने चौकशी दरम्यान त्याने जुलैच्या शेवटीही सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज दिल्याची कबुली दिली. हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी शौविक चक्रवर्ती याने पैसे दिल्याचंही तो म्हणाला.
झैदने सुशांतच्या मृत्यूनंतरही सॅम्युअलला ड्रग्ज दिले होते. शौविकने त्याला त्यासाठी रोख रक्कम दिली होती. चौकशी दरम्यान झैदने हेही सांगितलं की तो सगळे व्यवहार रोख रकमेवर करायचा आणि तो अब्दुल बासितला गूगल पे करायचा. सॅम्युअलला ड्रग्जचं पाकीट देण्यात यायचं. त्यामुळे अनेकदा सॅम्युअलद्वारेच रोख पैसे दिले जायचे.
सॅम्युअलने मार्च महिन्यात झैदला गोव्यात जाण्यास सांगितलं होतं. गोव्याहून एक महत्त्वाचा माल आणण्याबद्दल सॅम्युअल बोलला होता. झैदने हेही मान्य केलं की तो स्वतः ड्रग्ज घेतो. पण या प्रकरणात तो फक्त ट्रान्सपोर्टर होता. तो अब्दुल बासितला पैसे द्यायचा आणि त्याच्याकडून माल सॅम्युअलला द्यायचा.
रियाच्या ड्रग चॅटमध्ये गोव्याचा व्यावसायिका गौरव आर्याचंही नाव समोर आलं. याबद्दल ईडीनेही गौरव आर्याची दोन दिवस चौकशी केली होती. एनसीबीच्या चौकशीतही आता गोव्याचा उल्लेख आला. यावरून एनसीबी गौरव आर्याची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची शक्यता आहे.