चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकविरा देवी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुना सायन पनवेल महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. सोमवारी पहाटे 6 वाजता हा अपघात झाला. देवीच्या दर्शनासाठी गेलेले तरुण उरण येथील ओवळे गावातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारचा ताबा सुटल्याने हा अपघाता झाला. कार रस्त्यावर कोसळली, त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. अजय विष्णु गिरे असं मृत चालकाचे नाव आहे. अजय हा कार चालवत होता. कारमध्ये गजानन देवकर, निलेश मंजुळकर, सुभाष माळी, ज्ञानेश्वर माळी आणि गोपाळ माळी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती पनवेल पोलिसांना देण्यात आली. या अपघाताची नोंद पनवेल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी हा ग्रुप एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेला होता. रविवारी सायंकाळी परतत असताना तळेगाव येथील मित्राच्या घरी थांबला. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सकाळी ६ वाजण्याच्या गिरे यांचे वाहनावरिल नियंत्रण सुटले आणि कार पटली. यात कार चालकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Protected Content