भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर पार्कींगला लावलेला ट्रक चोरून नेल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ ते मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टर्न समोर चालक अरबाझ खान तस्लीम वय २७ रा. पाळधी ता. धरणगाव हा ट्रक क्रमांक (एमएच ४३ वाय ८०८७) ने ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता आलेला होता. त्याने ट्रक हॉटेलसमोरच पार्क करून लावला. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हा ट्रक चोरून नेल्याचे दुसऱ्या दिवशी गुरूवार ५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आले. ट्रक चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालक अरबाझ तस्लीम याने सर्वत्र शोध घेतला परंतू ट्रक संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहे.