धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील चिंतामणी मोरया नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी फोडून ७ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव शहरातील चिंतामणी मोरया नगरात श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. या केंद्राच्या मंदीराच्या गाभाऱ्यात दानपेटी ठेवण्यात आली आहे. ४ मार्च रोजी रात्री ८.३० ते मंगळवार ५ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदीराचे लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडून दानपेटी फोडून ७ हजार रूपयांची रोकड चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर येथे सेवा देणारे विजय देवराम महाजन यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील हे करीत आहे.