जळगाव प्रतिनिधी | शहरातील गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात ते जखमी झाले होते, दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्वर वामन मिस्तरी (वय ४५) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. गावातील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेत शिपाई म्हणून नोकरीला आहेत. सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी पत्नी लताबाई आणि मुलगा मयूर यांच्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी आला होता. दरम्यान शहरातील गांधी मार्केटजवळ राहणार्या आपल्या बहिण शोभाबाई राजाराम मिस्तरी यांच्याकडे आला होता. दरम्यान, आज सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्याने आपल्या बहिणीला आपण रूग्णालयात जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला. मात्र दवाखान्यात न जाता त्याने गांधी मार्केटमध्ये वर चढून तिसर्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर मिस्तरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी लताबाई, मयूर, प्रतिक, अभिषेक तीन मुले असा परीवार आहे. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.