दुचाकीस्लीप होवून गंभीर जखमी झालेल्या जळगावच्या तरूणाचा मृत्यू !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बोहार्डी गावाजवळ दुचाकी स्लिप झाल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २५ जून रोजी रात्री १०.३० वाजता घडली होती. याप्रकरणी बुधवारी २६ जून रोजी रात्री १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रावण रघुनाथ चव्हाण वय-२९ रा. मेहरूण, जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, श्रावण चव्हाण हा आपल्या परिवारासह जळगावातील मेहरूण परिसरात वास्तव्याला होता. मंगळवारी २५ जून रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तो भुसावळ तालुक्यातील बोहार्डी गावाकडून जळगावकडे येत असताना त्याची दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या संदर्भात बुधवार २६ जून रोजी रात्री १ वाजता वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नावेद अली सैय्यद हे करीत आहे.

Protected Content