जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश भास्कर नाडे (वय-३०) रा. राजीव गांधी नगर, जळगाव हा तरुण आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजुरीचे काम करून आपला उतरनिर्वाह करत होता. रविवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता तो जेवण करून घराबाहेर गेला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याचे नातेवाईक यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आला नाही. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रेल्वे रोळाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे, हरीश डोईफोडे करीत आहे.