यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली येथील शेतशिवारात गुरांना चारा घेण्यासाठी गेलेल्या एका शेतमजूराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

तालुक्यातील कोरपावली येथील सरवर महेबुब तडवी (वय ४८) हे शनिवारी सायंकाळी गुरांचा चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. कोरपावली -मोहराळे रस्त्यावरील मेहरान रसीद पटेल यांच्या शेताच्या बांधावरील गवत उचलत होते. परंतू गवतात पडलेल्या विज तारेचा स्पर्श झाल्याने सरवर तडवी यांचा जागीच मृत्यु झाला. लगतच असलेल्या वसीम रोशन पटेल यांना ही घटना दिसताच त्यांनी आरडाओरड करून राजु तडडी, जुम्मा तडवी, वसीम तडवी, हसन तडवी तसेच बाजार समीतीचे उपसभापती राकेश फेगडे व ग्रामस्थांनी सहकार्य करत येथील सरवर तडवी यांना ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तडवी यांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याचे सांगितले. तडवी यांच्या पच्छात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परीवार असून ते शेतमजूर असल्याचे घरातील कर्ता माणूस गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.