पहुर ता. जामनेर (प्रतिनिधी) विद्युत खांबातून प्रवाहीत विजेचा धक्का लागल्याने शेतात चरण्यासाठी सोडलेल्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी पहूर कसबे येथे घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर कसबे येथील गोविंदा घोंगडे हा शेतकरी हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कपाशीला खुरपणी करण्यासाठी गेले होते. काम झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी बैलाला चारा चरण्यासाठी सोडले. शेतातील विजेचा खांब्याला बैलाच्या तारेला धक्का लागल्यामुळे बैल जागीच गतप्राण झाला. यानंतर शेतकरी गोविंदा घोंगडे यांनी ताबडतोब पहूर पोलिस स्टेशन व पशु वैद्यकीय अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर यावेळी शेंदुर्णी पोस्टेचे ठाणे अंमलदार कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत आव्हाड महावितरणचे चौधरी आदींनी पंचनामा केला. घोंगडे यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पुढील कारवाई केली. ऐन हंगामात बैल मृत्यूमुखी पडल्याने शेतकरी घोंगडे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, शेतात असलेला विजेचा खांब ताबडतोब काढण्यात यावा, अशी मागणी शेतकरी गोविंदा घोंगडे यांनी केली आहे. तसेच ताबडतोब गरीब शेतकऱ्याला शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोविंदा गोड यांनी केली आहे.