अमळनेरात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील तांबेपुरा येथील पाण्याच्या टाकीच्या खाली शनिवारी २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अनोळखी ६० ते ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील तांबेपुरा येथील पाण्याच्या टाकीच्या खाली एका अनोळखी ६० ते ६५ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान मयताची ओळख पटवावी, असे आवाहन अमळनेर पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ हितेश चिंचोरे हे करीत आहे.

Protected Content