यावल प्रतिनिधी । जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा तथा स्वच्छा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बाजीराव कवडीवाले सराफा व्यवसायिक तथा यावल शहर शिवसेनेप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या दुकानास भेट देवुन कवडीवाले कुटुंबास धीर दिला. लवकरच दरोड्यातील गुन्हेगारांचा शोध लागेल, अशा विश्वास भेटी दरम्यान बोलतांना व्यक्त केला.
शहरातील मुख्य बाजार पेठेतील एका सराफा व्यवसायिकाच्या दुकानात काल दुपारच्या वेळी दरोडेखोरांनी शस्त्र दरोडा टाकुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागीने जबरी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रसंगी सराफा व्यवसायीक तथा शिवसेनीक जगदीश कवडीवाले व त्यांचे वडील रत्नाकर कवडीवाले यांनी दुकानात घडलेल्या दरोड्या संदर्भातील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना विस्तृत माहीती दिली.
यावेळी उपस्थित उप विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे बि के बकाले यांना तपासाचा वेग वाढवुन तात्काळ गुन्हेगारांचा शोध घ्यावा अशा सुचना पोलीस प्रशासनास दिल्यात . गुन्हे शाखेचे बि के बकाले यांनी पोलीस हा योग्य दिशेने जात असुन आपण गुन्हेगारांचा शोध घेण्यात यशस्वी होवु असा विश्वास त्यांनी पालकमंत्र्यांशी बोलतांना व्यक्त केला.
या भेटी प्रसंगी त्यांच्या सोबत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेने जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील , शिवसेनेचे यावल तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे , माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , शिवसेनेचे शरद कोळी , संतोष खर्चे, पप्पु जोशी , आदिवासी सेनेचे हुसैन तडवी , अजहर खाटीक यांच्यासह आदी शिवसेनिक यावेळी उपस्थित होते.