श्री क्षेत्र शेगाव नगरीत भाविकांची अलोट गर्दी

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विदर्भातील पंढरपूर म्हणून ख्यात असणार्‍या शेगाव नगरीत आज आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होत असून यासाठी लक्षावधी भाविक दाखल झाले आहेत.

 

श्री गजानन महाराज संस्थान मध्ये आषाढी एकादशीनिमित्त सायंकाळी श्रींच्या पालखी परिक्रमा होणार आहे. श्रींच्या पालखीचे गुरुवार दशमी नित्य नियमचा परिक्रमाप्रमाणेच आषाढी एकादशीची परिक्रमा राहणार आहे. श्रींच्या रजात मुखवटाचे पूजन होऊन टाळ मृदंगाच्या गजरात पालखी परिक्रमेस गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुरूवात होईल. पालखी सेवाधारी निवास श्री बाळाभाऊ महाराज मंदिर ,श्री महाप्रसादाला श्री लायब्ररी जाऊन पश्चिम द्वारातून श्री मंदिरामध्ये आगमन होईल.

 

परिक्रमेच्या  नंतर मंदिर परिसरात पालखीसह श्रींच्या रजत मुखवट्याचे दर्शन  भाविकांसाठी गुरुवार व दशमीच्या नित्य नियमाप्रमाणे खुले राहील  आषाढी मुळे एकही भाविक श्रीदर्शना विना वंचित राहू नये तसेच भाविकांची गर्दी पाहता श्रींचे समाधी दर्शन दिवस रात्र सुरूच राहणार आहे.  पेरणीचे दिवस असताना पंढरपूरला जाऊ शकत नाही. अशा भाविकांनी आपापल्या गावापासून संत नगरी शेगाव पर्यंत पायदळ वारी केली असून हजारो भाविक आषाढी एकादशीच्या पूर्वस्येला संतनगरीत दाखल झाले. श्रींचे रूपात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे भाविक मानतात.

 

गुरुवार हा श्री चा दिवस असून गुरुवारीच आषाढी एकादशी आल्याने हा योगायोग आहे .या शुभ या शुभ परवा वर असंख्य भाविक श्री संस्थानचे पारायण हॉलमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत होते.

 

श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या मुख्य शाखेसह श्री शेत्र पंढरपूर आळंदी ओमकारेश्वर त्रंबकेश्वर या संस्थांचे शाखाती आषाढी एकादशीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेतील आषाढी एकादशी व प्रमाणात साजरा होत आहेत .शेगाव संस्थान तर्फे साजरा करण्यात येणार्‍या काही महत्त्वाच्या सोहळ्यापैकी हा एक महत्त्वाचा सोहळा आहे. त्यामुळे शेगावात भाविकांची अलोट गर्दीचे चित्र आहे.

Protected Content