सहकार्यातून सहकाराची निर्मितीमुळे आपली संस्कृती एकमेकांना मदतीचे महत्व सांगते : कुलगुरु पी.पी.पाटील

f6952341 5050 4e5e 8621 1ecd449a8c04

 

जळगाव (प्रतिनिधी) भारतात सहकार चळवळीला शंभरवर्षापेक्षा अधिक परंपरा आहे. ’एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ’हे ब्रीदवाक्य असलेल्या सहकार चळवळीने ग्रामीण भागात अमुल्यबदल घडवून आणला. सावकारीतून मुक्तता व्हावी या हेतूने सहकाराचा उदय झाला. सहकार्यातून सहकाराची निर्मिती झाली. आपली संस्कृती एकमेकांना मदतीचे महत्व सांगते, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या प्रसंगी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.

 

कुलगुरु प्रा.पाटील पुढे म्हणाले की, पतपेढी ही देखील आपल्या आर्थिक संकटात मदतीचा हात पुढे करणारी संस्था आहे.  हे सभासदांनी लक्षात घ्यायला हवे. विद्यापीठ सुरु झाले तेव्हा जसे विद्यापीठ चालेल की नाही? अशा शंका अनेकांना येत होत्या तशाच शंका पतपेढीच्या स्थापनेच्या वेळी येत होत्या. मात्र गेल्या पंचवीस वर्षात आपल्या पारदर्शी कारभारातून या कर्मचारी पतपेढीने आपले वेगळेपण सिध्द केले आहे. आज पतपेढीचे ४७० सभासद असनू तर १ कोटी ७० लाख २६ हजार एवढे भाग भांडवल जमा आहे. कर्ज घेण्याची वृत्ती कमी करण्याचा विचार सभासदांना करावा लागणार आहे. सातत्याने कर्जावर अवलंबून राहणे चांगले नाही, असेही ते म्हणाले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रथम कुलगुरु डॉ.एन.के.ठाकरे, माजी कुलगुरु प्रा.सुधीर मेश्राम, कुलसचिव भ.भा.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, संस्थापक अध्यक्ष डी.एम.शिंदे, पतपेढीचे अध्यक्ष डॉ.महेंद्र महाजन, उपाध्यक्ष, मनोज वराडे, सचिव, ईश्वर सामुद्रे, संचालक, अशोक पाटील, अरुण सपकाळे, राजू सोनवणे, संजय ठाकरे, कल्याण ठाकरे, वैशाली शर्मा, प्रतीभा पाटील, प्रा.डॉ.किशोर पवार आदी उपस्थित होते.

 

माजी कुलगुरु डॉ. एन.के.ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, विद्यापीठाच्या नावातच उत्तर आहे. विद्यापीठाची प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याची परंपरा पतपेढीने जपली आहे. पतपेढीच्या स्थापनेपासून लेखा परीक्षणात ‘अ’ श्रेणी मिळविली आहे. त्याचा खुप अभिमान आहे. त्यासाठी मी पतपेढीच्या सर्व सभासदांचे अभिनंदन करतो. कोणतेही कार्य हे एकट्या नसते ते सर्वांचे मिळून असते सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा असतो. विद्यापीठाची श्रमसंस्कृतीची परंपरा आजही कायम आहे. ती तशीच कायम रहावी असे ही ते म्हणाले.

 

माजी कुलगुरु प्रा.सुधीर मेश्राम यांनी सांगीतले की, पतपेढीने ग्रामीण व दुर्गम भागातील काही गावे दत्तक घेऊन तेथील शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करावे. प्रारंभी आपले मनोगत व्यक्त करतांना पतपेढीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र महाजन यांनी पतपेढीच्या २५ वर्षातील वाटचालीचा आलेख मांडला. पतपेढी कडून भविष्यात सुरु करण्यात येणाऱ्या ग्राहक भांडार, स्कूल/अकादमी, वैद्यकिय सुविधा ह्या प्रस्तावित योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी पतपेढीने २५ व्या रौप्य महोत्सवी वर्ष विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पतपेढीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नितीन बारी, प्राचार्य डॉ. संभाजी देसाई, प्राचार्य पी.एच. पवार, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक विनोद पाटील, ज्योत्स्ना मेश्राम तसेच  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. पतपेढीच्या वार्षिक साधारण सभेच्या वेळी पतपेढीच्या सभासदांनी पु रग्रस्तासांठी २८ हजार रुपये तसेच पतपेढीचे अध्यक्ष डॉ.महेंद्र महाजन आणि उमवि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे यांनी एक-एक क्विटंल गहू पुरग्रस्तांसाठी दिले असून ते विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यु च्या विद्यार्थ्यांसोबत सांगली येथे पाठविण्यात येणार आहे. आभारप्रदर्शन ईश्वर सामुद्रे यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भालचंद्र सामुद्रे यांनी केले.

Protected Content