महिला टेलरने ब्लाऊज वेळेवर शिवून न दिल्याने न्यायालयाने ठोठवला १५ हजार रूपयांचा दंड

धाराशिव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धारशिव येथे एका महिला टेलरला एका महिलेचे ब्लाऊज वेळेवर शिवून न देणे चांगलेच महागात पडले आहे. पिडीत महिलेने थेट ग्राहकमंचाकडे धाव घेत या प्रकरणी दाद मागीतली. ग्राहक न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून टेलर महिलेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सोबतच महिलेचे ब्लाऊज देखील मोफत शिवून देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची चर्चा शहरात होत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार स्वाती प्रशांत कस्तुरे नामक महिलेने शहरातील नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे ब्लाऊज शिवायला टाकले. या साठी स्वाती यांनी नेहा यांना ॲडव्हान्स पैसे देखील दिले. मात्र, ठरलेल्या वेळेत नेहा यांनी स्वाती यांना त्यांचे ब्लाऊज दिले नाहीत. स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात धारशिव येथील नेहा संत यांना दोन वर्कचे ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. या साठी त्यांनी त्यांना वेळ देखील दिली होती. तसेच कामाचे आगाऊ पैसे म्हणून त्यांनी एकूण ६ हजार ३०० रुपये बिलापैकी ३ हजार रुपये ॲडव्हान्स दिले. ठरलेल्या दिवशी स्वाती या नेहा संत यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांचे ब्लाऊज झाले की नाही या बाबत विचारणा केली. मात्र, त्यांना त्यानहे ब्लाऊज वेळेवर शिवून दिला नाही. फोन, मेसेजद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही ब्लाऊज मिळाले नअसल्याने स्वाती कस्तुरे यांनी २८ एप्रिल २०२३ रोजी ॲड.प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. या तक्रार अर्जावर वर्षभरानंतर सुनावणी झाली.

Protected Content