‘चांद्रयान-३’च्या यशस्वी लँडींगची देशाला उत्सुकता !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणारे ‘चांद्रयान-३’ हे आज सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून या ऐतीहासीक क्षणाची कोट्यवधी नागरिकांनी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.

मिशन चांद्रयान-३ आज चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे. इस्रोचे अंतराळ यान यशस्वीरित्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आणि आज लँडींगचा क्षण आलेला आहे. विक्रम लँडर २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लँडिंग यशस्वी होईल, असा दावा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. आतापर्यंत मिशन उत्तम प्रकारे सुरू आहे आणि सर्वांच्या नजरा सॉफ्ट लँडिंगवर आहेत. तो यशस्वी झाल्यास भारत हा पराक्रम करणारा चौथा देश ठरेल. आतापर्यंत अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि रशियाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे. त्याच वेळी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा जगातील एकमेव देश बनेल. देशाच्या अंतराळ संशोधनातील हा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

आज सकाळपासूनच चांद्रयानबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. देशभरात या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ठिकठिकाणी पूजा-पाठ केले जात आहेत. तर हजारो ठिकाणी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा करण्यात आलेले आहेत. लँडिंगचा थेट कार्यक्रम ५:२० वाजता सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमात व्हर्च्युअल प्रकारात सामील होणार आहेत. सध्या पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेत असल्यामुळे ते ऑनलाईन या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

 

भारताचे महान अंतराळ शास्त्रज्ञ दिवंगत विक्रम साराभाई यांच्या नावावर असलेले चांद्रयान-३ मध्ये विक्रम लँडर आज ऐतीहासीक कामगिरीच्या उंबरठ्यावर आहे. याच विक्रम लँडरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग शक्य होणार आहे. यासोबत विक्रम लँडरमध्ये  प्रज्ञान रोव्हर असून ते पुढील १४ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करणार आहे.

 

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे आयुष्य पृथ्वीच्या १४ दिवसांइतके सांगितले जात आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सौरऊर्जेतून चंद्रावर ऊर्जा मिळवून त्यांचे मिशन पूर्ण करतील. अशा स्थितीत १४ दिवसांनंतर जेव्हा चंद्राच्या या भागावर अंधार पडेल तेव्हा हे अभियान संपुष्टात येणार आहे. अर्थात, या १४ दिवसांमध्ये इस्त्रोच्या संशोधकांना अतिशय महत्वाची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

Protected Content