नेहमी नादुरुस्त होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरपासून बाणगावकरांची सुटका

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बांणगाव येथील रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असे. यामुळे नागरिक नेहमी त्रस्त असायचा. अशातच आता वीज वितरण विभागाकडून केबल बसविण्यात आल्याने या समस्येपासून बाणगावकरांची अखेर सुटका झाली आहे.

 

तालुक्यातील बांणगाव येथील ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) हा वारंवार जळून गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त होत होता. यामुळे येथील नागरिक या समस्येने ग्रस्त होते. दरम्यान या रोहित्रमुळे नागरिकांची अथवा वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. सदर गंभीर बाब कळताच   कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बांणगावमध्ये केबल टाकण्यात आली.

 

दरम्यान केबल जोडल्यानंतर तब्बल नव्वद कनेक्शन हे त्वरीत देण्यात आले आहे. त्यापैकी २३ जणांना जागेवर मीटर देऊन वीज कनेक्शन जोडण्यात आले. यामुळे वीज ग्राहकांकडून वीज वितरण कंपनीचे आभार मानले जात आहे.

 

सदर मोहिम कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता शेळके, सहायक अभियंता विशाल सोनवणे यांच्यासह केबल टाकण्यासाठी गणेश अहिरे, वाल्मिक पाटील, कपिल राजपूत आदींनी परिश्रम घेतले आहे. तत्पूर्वी कोणीही वीजेची चोरी न करता अधिकृतपणे वीज जोडणी करून घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी केले आहे.

Protected Content