जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यगेटजवळील पार्कींगमधून एका ठेकदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रोहित नंदू चव्हाण हा तरूण आपल्या परिवारासह दर्शन कॉलनी येथे वास्तव्याला आहे. शासकीय बांधकाम करण्याचे ठेका घेवून आपला उदरनिर्वाह करतात. २ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता ते त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीबी ५०७०) ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य गेटजवळील पार्कींग जवळ दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुपारी १.३० वाजता हा प्रकार समोर आला. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवार ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे ह्या करीत आहे.