बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | चिखलीहून बुलढाण्याकडे येणाऱ्या कंटेनरने दुचाकी चालकाला धडक दिल्याची घटना आज २५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चिखली रोडवरील विद्युत कार्यालय जवळ घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दूसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सुमेध कराळे असे मृतक तरुणाचे नाव असून तो बुलढाणा शहरातील भीमनगर मध्ये राहणार आहे तर श्रावण गजानन हेलोडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिखलीकडून बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली, या अपघातात कंटेंरचे चाक दुचाकी चालकाच्या अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला, या घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती, त्यामुळे चिखली रोडवरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.