यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल ते भुसावळ मार्गावरील राजोरा फाटा ते अंजाळे रस्त्या दरम्यानच्या खड्डेमय झालेल्या जीवघेण्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरूवात झाली आहे. लाईव्ह ट्रेंड न्युज व्दारे सातत्याने रस्ता दुरुस्ती संदर्भातील बातम्यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र नवनिर्माण सेने व्दारे देण्यात आलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल घेतली आहे .
यावल ते भुसावळ दरम्यानच्या मार्गावरील सुमारे १७ किलो मीटरच्या रस्त्यावर राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यंत रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे जिवघेणे खड्डे निर्माण झाले आहे. या वाहनांची वर्दळ असलेल्या मार्गावरील रस्त्यावर अनेक अपघात झालेले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग यावलच्या निर्दशनास ही बाब वृत्ताच्या माध्यमातून वेळोवेळी लाईव्ह ट्रेन्ड न्युज मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे याच बरोबर नागरिक व वाहनधारकांच्या सुरक्षा व हिताच्या दृष्टीने मागील आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहिन विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसात सदरचा रस्ता दुरूस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता .
दरम्यान वेळोवेळी प्रसिद्ध झालेले वृत्त व मनसे दिलेला आंदोलनाचा ईशारा या पार्श्वभुमीवर यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने दखल घेत अखेर या मार्गावरील २५ /०० ते २६ / ४५० पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आली असल्याने खड्डेमय रस्त्याच्या त्रासातुन कायमची सुटका मिळणार असल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे .