पाचोरा येथे मुख्य ध्वजारोहण समारंभात ‘व्यसन मुक्ती’चा संकल्प (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 16 at 1.35.13 PM

पाचोरा, प्रतिनिधी | आज १५ ऑगस्ट हा भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन तालुक्यात सर्व विद्यालयात व शासकीय कार्यलयातील उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्य कार्यक्रम पाचोरा भडगावं रोडवरील पोलीस मैदानात राष्ट्रीय ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी राजेंद्र कंचरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात विविध व्यसन मुक्तीचा संकल्प करण्यात आला. संकल्प झाल्यानंतर शपथ घेतल्यानंतर विविध योजना अंतर्गत काम केलेला बचतगटाच्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात खेडगाव नंदीचे, बांमरूड राणीचे, परधाडे सह अनेक गावांच्या महिलांचा समावेश होता. पोलिस बांधवांसाठी आरोग्य शिबीर व जेसीआयतर्फे पोलिस कर्मचारी अधिकारी यांच्यातर्फे रक्त तपासणी करण्यात आली. या वेळी आमदार किशोर पाटील, पोलिस, उओअधीक्षक ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावरे, मुख्यअधिकारी सोमनाथ आढाव ,नगरअध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सभापती बन्सीलाल पाटील ,उपसभापती अनिता पवार, माजी सभापती सुभाष पाटील, वन विभाग अधिकारी ज्ञानेश्वर देसाई ,वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, राहुल बेहरे ,नितीन सुरवंशी, प्रकाश पाटील , तसेच सर्व पोलीस स्टेशनचे व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, शिक्षण संस्थेतील अधिकारी,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना चे पदाधिकारी व इतर पत्रकार संघटना व कर्मचारी तसेच पाचोरा शहरातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.

Protected Content