वृध्दाचे बंद घर फोडून २ लाख ६९ हजारांचा ऐवज लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनी येथील वृद्धाचे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २९ जुलै रोजी मध्ये रात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रामप्रसाद गोपाल चंदन वय-६६, रा. गुंजाळ कॉलनी, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २७ जुलै रोजी रात्री १० ते २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाउंड गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. या घटनेबाबत रामप्रसाद चंदन यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.

Protected Content