जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील अशोक इंडिया ईलेक्ट्रीकल इंडस्ट्रिजच्या स्टोअर रूम फोडून ७० हजार रूपये किंमतीचे तांब्याचे व पितळाचे फ्यूजला लागणारे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हेमंत नंदलाल रंगलानी वय ५२ रा. टेलीफोन नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे एमआयडीसीतील सेक्टर-एन मध्ये अशोक इंडिया ईलेक्ट्रीक इंडस्ट्रिज नावाची कंपनी आहे. २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रूपये किंमतीचे तांब्याचे व पितळाचे फ्यूजला लागणाऱ्या साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे मालक हेमंत रंगलानी यांनी चोरी झाल्याबाबतची सर्वत्र चौकशी केली. परंतू चोरी झाल्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर रविवारी २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजतात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.