अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या सत्यशोधक मुक्ता साळवे बालमंचावरील बाल कलाकारांनी विद्रोहीच्या मंचावर सादर केलेल्या समूह गीते, नाट्यभिनय, वेशभूषा व प्रबोधन गीतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
सर्व मुला मुलींनी अतिशय सुंदर सादरीकरण केले. नाट्यभिनयात विविध संदेश देणा-या नाटिका पाहून प्रेषक मंत्रमुग्ध होऊन गेले होते.या मंचाचे उद्घाटन प्रा.उल्हास पाटील यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एल.जे गावीत, तर स्वागत शाम पाटील यांनी केले.
शहीद भगतसिंग युवा मंच चे दुपारच्या सत्रामध्ये उद्घाटन भरत यादव यांनी केले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ नेवे व पुरूषोत्तम आवारे पाटील हे होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड नाना अहिरे होते.मंच चे संयोजक बळवंत भालेराव,प्रा यशवंत मोरे होते.या सत्राची सुरूवात लोकशाहीर वामन दादा कर्डक यांच्या ‘वंदन माणसाला ‘या गीताने केली अजय भामरे यांनी सुमधुर आवाजात गीत गायिले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संदीप तायडे व आभार महेश पाटील यांनी केले.
आदिवासी क्रांतिवीर ख्वाजा नाईक सभामंडपात साहित्य रसिकांच्या गर्दीने गच्च भरला होता प्रा.मिनाक्षी वाघमारे यांचा “मी सावित्रीमाई फुले बोलतेय” एकपात्री प्रयोग साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. बाल मंचावरील नियोजन स्नेहल शिसोदे, शैलजित शिंदे, भाविका वाल्हे, अजिंक्य सोनवणे, नाजमीन पठाण यांनी केले होते. बाल मंच व युवा मंचचे व्यवस्थापन संयोजक सोपान भवरे यांनी केले.