शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत केलेल्या कामगिरीसाठी शेंदुर्णी नगर पंचायतीला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून या कार्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यातर्फे अभिनंदन पत्राव्दारे शेंदुर्णीच्या मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग द्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन या बाबींत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनी शनिवार, दि. 05 जून, 2022 रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या समारंभात नगरपंचायत गटांत शेंदुर्णी नगरपंचायतीला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करणेत आला.
माझी वसुंधरा अभियान 2.0 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कामाची प्रत्यक्ष पडताळणी करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देवुन उच्चतम कामगिरी करुन घेण्यासाठी नगरपंचायतीतील सर्व घटकांना प्रोत्साहित करणे, आपण दिलेल्या या योगदानामुळे जिल्ह्याची कामगिरी उंचावण्यात निश्चीतच मदत झालेली आहे. आपल्या दिलेल्या योगदानाबद्दल आपले व आपल्या सहकार्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो व कामात असेच सातत्य राखुन यापुढेही अशीच उज्ज्वल कामगिरी आपल्याकडून घडो असे सुयश चिंतितो, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले आहे.