चॅम्पियन लवकर मैदान सोडत नाही – गांगुली

sourav ganguly

 

मुंबई प्रतिनिधी । अष्टपैलू फलंदाज महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन आहे. आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, अशा शब्दांत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सौरव गांगुली यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी धोनीशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली नाही. मात्र त्याच्याशी चर्चा करून त्याच्या भविष्यातील योजना जाणून घेण्यात येतील. धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, असं सौरव यांनी स्पष्ट केलं. यावेळी सौरवने स्वत:चं उदाहरणही दिलं. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून दीड वर्ष बाहेर रहावं लागलं होतं. मात्र त्यानंतर मी संघात जोरदार पुनरागमन केलं आणि दोन वर्ष मैदानावर तळ ठोकला, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय क्रिकेटला उंचीवर घेऊन जाण्याची विराटमध्ये क्षमता आहे. गेल्या ४-५ वर्षातील विराटचा खेळ पाहिल्यास तुम्हाला त्याची आपोआप जाणीव होईल. मी स्वत: टीम इंडियाचा कर्णधार होतो. त्यामुळे कर्णधाराच्या काय जबाबदाऱ्या असतात हे मी जाणून आहे, असं सांगतानाच उद्या गुरुवारी मी विराटशी चर्चा करणार आहे. विराट टीम इंडियाचा कर्णधार असून तो टीम इंडियाचा महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, असंही गांगुलींनी सांगितलं. यावेळी गांगुलींनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून करण्यात येणाऱ्या भविष्यातील योजनांबद्दलही माहिती दिली. तसेच टीम इंडियाच्या कामगिरीवर आनंदही व्यक्त केला.

Protected Content