नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२४ च्या प्रशासकीय सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा २६ मे रोजी होणार होती. परंतू लोकसभा निवडणूक असल्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा आणि लोकसभो निवडणुकीमुळे आयोगाची तारीख सारखीच आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेसाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ जून २०२४ रोजी आता पूर्व परीक्षा होणार आहे, तर मुख्य परीक्षा २० सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधी दरम्यान घेण्यात येईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२४ पर्यंत होती. अर्जातील दुरुस्तीसाठी ७ मार्च ते १३ मार्च २०२४ ही मुदत देण्यात आली होती. ही परीक्षा एकूण ८० केंद्रांवर घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा एकूण 24 केंद्रांवर घेतली जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोग एकूण 1,056 प्रशासकीय जागेसाठी परीक्षा घेणार आहे.