कौशल्य विकास, रावेर या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरिता 1 एप्रिल,2024 ते 15 जुलै, 2024 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी अटी :-  उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक), उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा शालांत परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा, उमेदवार हा 18 वर्ष वय पुर्ण झालेला असावा,
वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय / निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येते प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती असणे आवश्यक आहे.

शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी गुण पत्रिकेची प्रत, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला इ. अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ रावेर येथे प्रत्यक्ष 10 ते 2 वाजेपर्यंत सपर्क साधावा,  तसेच प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:करावी लागेल, मुलाखत दिनांक – 28 मार्च, 2024 राहिल, संर्पकासाठी दुरध्वनी क्रमांक – 02584-251906, भ्रमणध्वनी क्रमांक – 8668817893 असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी रावेर, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content