Home क्राईम सिमेंट मिक्सर डंपरची कारला धडक; कारचे मोठे नुकसान

सिमेंट मिक्सर डंपरची कारला धडक; कारचे मोठे नुकसान


nandra

नांद्रा प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदाजवळ मिक्सर डंपर व टाटाची एक्सएमएक्स हे दोन्ही वाहने एकमेकात घुसल्याने लहान वाहनाचे नुकसान झाले. या घटनेमुळे डंपरचालकास वाहन नागरीकांना पकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला म्हसावद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

म्हसावद पोलीसात तक्रार
सिमेंट मिक्सर वावडद्याकडून नांद्राकडे जात असतांना डंपर क्रमांक (एमएच 15 सीके 6145) जात असतांना त्याच दिशेने टाटा एक्सएमएस कार क्रमांक (एमएच 18 एजे 6879) ला कट मारल्याने कार नांद्रा येथील नातेवाईकांन फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांना नांद्रा येथे डंपरचालकाला पकडले. त्याला मारहाण करण्यात आले. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान संतप्त नागरीकांना मिक्सर डंपर चालकाला चांगलाच चोप दिला. नांद्राजवळ मिक्सर डंपरला आडवुन ठेवुन डंपर वाल्यास मारठोक करण्यात आली व शेवटी हा वाद म्हसावद पोलीस स्टेशनला पोचला.

धुळीचे प्रमाण वाढले मोठ्या वाहनांमुळे
गेल्या अनेक दिवसांपासून या पाचोरा ते जळगाव या रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे काम करत असतांना अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान मोठी वाहने हळू चालविण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound