राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी ते १ मार्च पर्यंत चालणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 26 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एक मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करेल. अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्य सरकार अर्थसंकल्पच्या माध्यमातून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष राहील.

राज्य सरकारच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीमध्ये राज्य सरकारचे आणखी एक अधिवेशन होईल. 26 फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार आणखी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीच्या आधी हे अखेरच्या अधिवेशन असणार आहे. त्यामुळे राज्य सरकार जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच लोकसभा निवडणुका तोंडावर असताना या अधिवेशनात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करतील. अधिवेशनानंतर लगेचच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने, राज्य सरकार जास्तीत जास्त कामकाज करण्याचा प्रयत्न करेल

Protected Content