चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना बाधीतांची संख्या आटोक्यात येत असताना विना मास्क धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडा येथील विराम लॉन्स समोर २२ विना मास्क धारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी ग्रामीण पोलीसांच्या मदतीने चैतन्य तांडा येथील विराम लॉन्स समोर विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्येकी १०० रूपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आले असून एकूण २२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण २२०० रूपये वसूली करण्यात आले. चैतन्य तांडाने अद्यापपर्यंत केलेल्या कारवाईतून ग्रामपंचायतीच्या महसूलात प्रचंड वाढ झालेली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई सहाय्यक हवा. युवराज नाईक, जंजाळे, विस्तार अधिकारी कैलास माळी, माजी चेअरमन दिनकर राठोड व ग्रामपंचायत सदस्य आदींनी केली.