सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील लिंगायत कोष्टी समाज महिला मंडळाच्या भगिनींनी सैनिकांना राखी पाठवल्या. त्या सीमेवरील जवानांना मिळाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.
येथील लिंगायत कोष्टी समाज महिला मंडळातील स्वाती अभिजित कोष्टी, नेहा संजय बन्नापुरे, नेत्रा गणेश कोष्टी, वैशाली राजेंद्र कोष्टी, लता सुभाष कोष्टी, सुनीता सुरेश कोष्टी, उर्मिला संजय गरडे, मनीषा सुधाकर कोष्टी, वैशाली सतीश नारळे, अपेक्षा योगेश कोष्टी, योगिता चंद्रकांत कोष्टी, रुपाली विकास बावणे, ज्योती प्रशांत सरोदे यासह इतर महिलांनी गावावरुन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांना राखी पाठवल्या. सीमेवरील जवानांना त्या मिळाल्या.
बहिनीने भावाला पाठविलेली राखी ही रक्षाबंधनच्याच दिवशी काश्मीर येथे कार्यरत असलेले जवान जगदीश सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. राखी हातावर बांधून त्यांनी बहिणीचे आभार मानले. गेल्या अनेक वर्षाच्या कारर्किर्दीत पहिल्यांदाच आपल्या गावावरुन राखी आली आणि रक्षाबंधन हा सण साजरा करता आला. असे त्यांनी गहिवरुन सांगितले.
‘आपण हाती घेतलेल्या छोट्या छोट्या उपक्रमातून देशाच्या सैनिकास आंनद मिळाला असे उपक्रम सुरु राहावेत.’ असे मत गणेश कोष्टी यांनी व्यक्त केले.