Home Cities जळगाव भोकर येथील आर.एन.लाठी विद्यालयातर्फे गावात प्रभातफेरी

भोकर येथील आर.एन.लाठी विद्यालयातर्फे गावात प्रभातफेरी

0
105

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भोकर येथील आर.एन.लाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सकाळी गावातून प्रभात फेरी काढून पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. 

जळगाव तालुक्यातील भोकर येथील आर.एन. लाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. या प्रभातफेरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभावना, देशप्रेम याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यावेळी लेझीम पथकाच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधले होते.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम चिंचाळे, उपप्राचार्य संभाजी पवार, प्राध्यापक अनिल अंभोरे, प्रेम इंवर, राहुल राजपूत, पंकज गायकवाड, वर्षा सोनवणे, मंगेश शेळके, सूर्यकांत सोनवणे, मयुरी अहिरे, रवी लोखंडे, हर्षल पाटील, श्री. न्याहाळदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound