धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बसस्थानक आवारात एका अनोळखी अंदाजे 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार 28 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास धरणगाव बसस्थानक आवारातील मोकळ्या जागेत एका अनोळखी अंदाजे 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून झाला. त्यानंतर धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि धरणगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला. दरम्यान मयताची ओळख पटवावी, असे आवाहन धरणगाव पोलिसांनी केलेले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन पाटील करत आहे.